¡Sorpréndeme!

भुजबळ लवकरच बाहेर येतील, दिलीप कांबळेंचं खळबळजनक वक्तव्य | Chhagan Bhujbal Latest Update

2021-09-13 0 Dailymotion

छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असं खळबळजनक विधान आज राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.दिलीप कांबळे यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची चिन्हे आहेत.या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. ‘ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता, ते कलम रद्द झालय. त्यामुळे आता ते लवकरच बाहेर येतील’, असा आशावादही कांबळेंनी व्यक्त केलाय.आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्याचं कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. तसंच कलम 45 च्या शर्तींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेत. त्यामुळं अशा आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews